Pashchim Maharashtra

शेतकऱ्यांच्या नाही, तर ड्रायव्हरच्या मुलाची बदलीसाठी जिल्हा बँकेत; शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजेंना टोला

Published by : left

प्रशांत जगताप, सातारा | खासदार उदयनराजे भोसले हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा बँकेत नाही तर आपल्या ड्रायव्हरच्या मुलाची बदली करण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन आणि सदस्यांना बोर्ड मीटिंगमध्ये भेटण्यासाठी आले होते.. पण संचालकांच्या मिटींगला ते उपस्थित राहात नाहीत यावर उदयनराजेंचे शेतकऱ्यांवरचे प्रेम दिसतय असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांना लगावलाय..

सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातारच्या दोन्ही राजांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. उदयनराजे आज जिल्हा बँकेत आले होते, त्याविषयी शिवेंद्रसिंहराजेंना विचारले असता ते म्हणाले, "ते बँकेत बैठकीसाठी आले नव्हते. ते सभापती रामराजे आणि चेअरमन यांना खासगीत भेटायला आले होते. मला कळाले की ते महत्वाच्या विषयावर भेटायला आले होते. ज्याचा परिणाम जिल्हा बँकेवर होऊ शकतो. त्यांच्या ड्रायव्हरचा मुलगा बँकेत कामाला आहे. त्याची बदली करून हवी होती. त्यासंदर्भात ते भेटायला आले होते." 'तो' त्यांचा मोठा विषय होता. आम्ही सर्व संचालक ते बैठकीत येतील यासाठी त्यांची वाट पहात होतो. त्यांचे ज्ञान व एवढ्या उंचीवरील माणूस आमच्या बैठकीत येऊन बसणार यामुळे आम्ही सर्वजण आतूर झालो होतो. पण, ते उडत उडत रामराजेंकडे गेले, असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा