shivsena 3rd list 
Vidhansabha Election

Shivsena Candidate 3rd List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगले व शिरोळ मतदार संघ मित्र पक्षांना सोडणार आहेत.

Published by : Team Lokshahi

शिवसेनेने (एकनाथ शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीद्वारे शिवसेनेने भाजपाच्या शायना एन. सी. यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांना वरळीतून उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, आता त्यांना शिवसेनेने (शिंदे) मुंबादेवीमधून उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना, तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा