अध्यात्म-भविष्य

Shravan Durgashtami: 'या' उपायांनी मिळवा महादेवासोबत दुर्गा मातेचा आशिर्वाद

मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची विधीपूर्वक पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी पौराणिक श्रद्धा आहे.

Published by : Team Lokshahi

श्रावन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावन दुर्गाष्टमी व्रत पाळले जाईल. यावेळी ही शुभ तारीख गुरुवार 24 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी महादेवासह दुर्गा मातेचीही पूजा केली जाणार आहे. दुर्गाष्टमी जरी दर महिन्याला येत असली तरी श्रावण महिन्यात येणार्‍या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्व दिले आहे. या दिवशी भक्तीभावाने उपवास करून नित्य पूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुख-समृद्धी मिळते. शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत, जे केल्याने महादेवासह दुर्गा मातेचीही कृपा होते. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल...

श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला ९ मुलींना खाऊ घालणे उत्तम मानले जाते, परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला आदराने घरी बोलावून लाल रंगाची ओढणी अर्पण करून भोजन द्यावे. यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे. या साहित्यात शिक्षण, खेळ, कपडे, फळे, मिठाई, दक्षिणा, मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात. असे केल्याने दुर्गा मातेची कृपा होते आणि घरात सुख-शांती राहते.

लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रावन महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक सुपारी घेऊन त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा मातेला अर्पण करा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि नोकरी-व्यवसायात प्रगती होते.

दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन लाल ओढणीत माखणा आणि बत्तासे ठेवून मातेला अर्पण करा. यासोबत मालपुआ आणि केशर मिश्रित खीर दान करावे. यानंतर, विवाहित महिलेला सौभाग्याचा सामान द्या. असे केल्याने सुदृढ आरोग्य प्राप्त होते आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

श्रावन महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा मातेसोबत शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने भगवतीचा तसेच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण लक्षात ठेवा की, दुर्गादेवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस, दुर्वा, आवळा, रुई मदार इत्यादी फुलांचा वापर करू नये.

श्रावन महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी लाल कापड घ्या. त्यावर बसून देवीसमोर आग्नेय दीशेला दीवा प्रज्वलित करावा. आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करा आणि पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला ठेवा. अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धी होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी