अध्यात्म-भविष्य

Shrawan Vinayak Chaturthi : कधी आहे विनायक चतुर्थी? बनणार 'हे' 5 अप्रतिम योग

श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी 20 ऑगस्ट 2023 रोजी आहे. या दिवशी रिद्धी सिद्धी दाता आणि शिवपुत्र गणेशजींची पूजा केली जाते. पुराणानुसार चतुर्थी ही गणपतीची जन्मतारीख मानली जाते

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Shrawan Vinayak Chaturthi 2023 : श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी 20 ऑगस्ट 2023 रोजी आहे. या दिवशी रिद्धी सिद्धी दाता आणि शिवपुत्र गणेशजींची पूजा केली जाते. पुराणानुसार चतुर्थी ही गणपतीची जन्मतारीख मानली जाते, अशा प्रकारे जो दर महिन्याला विनायक चतुर्थीला बाप्पाची पूजा करतो त्याच्या सर्व समस्या दूर होतात. या वर्षी श्रावण विनायक चतुर्थी खूप खास आहे, कारण या दिवशी 5 शुभ योगांचा संयोग होत आहे. श्रावण विनायक चतुर्थी व्रताची शुभ मुहूर्त, शुभ योग आणि पद्धत जाणून घेऊया.

श्रावण विनायक चतुर्थी 2023 मुहूर्त

श्रावण शुक्ल चतुर्थी तारीख 19 ऑगस्ट 2023, रात्री 10.19 वा. सुरू होईल. आणि समाप्ती 21 ऑगस्ट 2023, सकाळी 12.21 वाजता होईल. पूजा मुहूर्त सकाळी 11.26 ते दुपारी 01.58 वाजेदरम्यान असेल. चंद्रोदयाची वेळ सकाळी 09.03 आणि चंद्रास्त वेळ 09.09 रात्री असेल.

श्रावण विनायक चतुर्थी 2023 शुभ योग

यावर्षी श्रावण विनायक चतुर्थीला 5 शुभ योग सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, रवियोग, शुभ योग आणि साध्य योग यांचे मिश्रण तयार होत आहे. जे व्रताचे अनेक पटींनी फल देईल. कामात यश मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

श्रावण विनायक चतुर्थीसाठी शक्तिशाली मंत्र

प्रतर्णमामि चतुराणनवंद्यामानमिच्छनुकूलमखिलं च वरं ददानम् ।

तंतुंदिलं द्विरसनाधिपैज्ञासूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय।

प्रतर्भजाम्यभयदं खलु भक्तशोकदवनलं गणविभुं वरकुंजरस्यम् ।

अज्ञानकाननविनाशनहव्यवाहमुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य।।

श्रावण विनायक चतुर्थी पूजा पद्धत

विनायक चतुर्थीला दुपारी पूजा केली जाते, म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा करून उपवासाचे व्रत करावे. श्रीगणेशाच्या मूर्तीसमोर उदबत्ती, दिवा इ. लावावे. गणपती बाप्पाच्या चित्राला किंवा मूर्तीला गंगेच्या पाण्याने स्वच्छ करा. गणेशाला सिंदूर टिळक लावा. या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करायला विसरू नका आणि पूजेच्या शेवटी श्रीगणेशाची आरती करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा