Shrikant Shinde 
Vidhansabha Election

सरकारच्या योजना घराघरात पोहचवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी राबवले उपक्रम

राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकापेक्षा एक योजनांना विरोध करण्यासाठी विरोधकांकडे ठोस असा उतारा सापडत नसताना त्याच योजना प्रभावीपणे घराघरात पोहोचवण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आणि विरोधकांची चांगलीच डोकेदुखी वाढवली. या सर्व योजना घराघरात पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतले.

Published by : Team Lokshahi

राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकापेक्षा एक योजनांना विरोध करण्यासाठी विरोधकांकडे ठोस असा उतारा सापडत नसताना त्याच योजना प्रभावीपणे घराघरात पोहोचवण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आणि विरोधकांची चांगलीच डोकेदुखी वाढवली. या सर्व योजना घराघरात पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतले. दिवसाला स्वतः 25 कुटुंबांना भेट देत सुरू केलेल्या योजनांपैकी प्रमुख 10 योजना त्यांनी घराघरात पोहोचवल्या.

कोणत्या योजना घराघरात पोहचवल्या?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

लेक लाडकी लखपती योजना

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना

कामगार कल्याण योजना

महिला बचत गटासाठी विविध योजना

अशा महायुती सरकारच्या टॉप 10 योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगत अभियानाचा मुख्य उद्देश साधत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला पगडा भारी करत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांसमोर पेच निर्माण केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अधिकचे यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी सोपी नसल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचे हे अभियान पालघर, मुंबई, ठाणे यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवले जात आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीनंतर काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेल्या विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी कमकुवत बाजू सापडतच नाही. सरकारच्या योजनांचा सकारात्मक परिणाम जनतेत झाला तर महायुतीला अर्थातच शिवसेनेला अपेक्षित असे यश महाराष्ट्रात मिळेल यात शंका नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Banjara Reservation : "ST आरक्षण द्या..." सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करत, बंजार समाजातील तरुणाचे टोकाचे पाऊल

Gemini Retro Photos : तुम्हाला सुद्धा रेट्रो फोटो तयार करायचा आहे? पण कसा करायचा तेच माहित नाही, मग या स्टेप्स करा फॉलो

IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना, LIVE कसं पाहता येणार जाणून घ्या....

Ajit Pawar : "मला जे उत्तर द्यायचं ते..." कुर्डूतील IPC अधिकारी प्रकरणावर बोलताना अजित पवारांच पडखर भाष्य