Uncategorized

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : राणे यांची प्रतिष्ठा पणाला

Published by : Lokshahi News

Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक पार पडतेय. निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायसा मिळणार आहे.

19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला आहे.2008 पासून बँक राणे यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, 2017मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी राणे यांच्यापासून वेगळेपण घेत शिवसेनेत गेले. त्यानंतर बँक शिवसेनेच्या ताब्यात दोन वर्ष राहिली.

सध्या महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत होत आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेतर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आणि विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा