Diwali 2024

Raj Thackeray: मनसेच्या दिपोत्सवात कलाकारांची मांदियाळी, रोहित शेट्टी, अजय देवगण

आजपासून मनसेच्या दिपोत्सवाची सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेता अजय देवगण, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत दिपोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Published by : Team Lokshahi

आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. रमा, एकादशी, वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. मुंबईतील सांस्कृतिक केंद्र असलेले दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिपोत्सव साजरा केला जातो. आजपासून मनसेच्या दिपोत्सवाची सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेता अजय देवगण, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत दिपोत्सवाला सुरुवात झाली आहे.

सिंघम अगेनची स्टार कास्ट शिवाजी पार्कात

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा आगामी सिनेमा सिंघम अगेन या चित्रपटाचे प्रोमोशन दिपोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले. सिंघम अगेन हा सिंघम या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या सिनेमामध्ये आपल्याला तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगण, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री दिपीका पदुकोण, अभिनेत्री करिना कपूर, अभिनेता विकी कौशल, अभिनेता अक्षय कुमार आदी कलाकारांचा समावेश आहे.

अमित ठाकरे यांना पुढच्या वर्षी या ठिकाणी आमदार म्हणून पहायला आवडेल: शर्मिला ठाकरे

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवाजी पार्क मैदानामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षी मनसेचे उमेदवार असलेले अमित ठाकरे यांना पुढच्या वर्षी या ठिकाणी आमदार म्हणून पहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी लोकशाहीसोबत बोलताना व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा