India

२९ ऑगस्टपासून धावणार भारत दर्शनची विशेष रेल्वे

Published by : Lokshahi News

२९ ऑगस्टपासून भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) 'भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन्स' सुरू करणार आहे. हैदराबाद, अहमदाबाद, निष्कलंक महादेव शिव मंदिर, अमृतसर, जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी ठिकाणांचा या टूरमध्ये समावेश आहे. टूर पॅकेजची एकूण किंमत ११,३४० पासून सुरू होते. हा प्रवास २९ ऑगस्टला सुरू होऊन १० सप्टेंबरला संपेल.

या रेल्वेचे बुकिंग कसे करायचे? ही टूर कुठून सुरु होईल आणि पॅकेजमध्ये काय-काय मिळणार? याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. पण तत्पूर्वी पर्यटकांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट (प्रवासाच्या तारखेपूर्वी ४८ तासांपेक्षा कमी) सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे.


आयआरसीटीसी टुरिझमच्या माहितीनुसार देशातील सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश या टूर पॅकेजमध्ये असेल. हे सर्वात स्वस्त टूर पॅकेजपैकी एक आहे. भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनचे बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.irctc.co.in/ वर ऑनलाइन उपलब्ध आहे. आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील पर्यटकांना बुकिंग करता येईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा