Mumbai Indians Vs Sunrisers Hyderbad 
क्रीडा

SRH vs MI : आयपीएलमध्ये ऐतिहासिक कारनामा, एकाच सामन्यात १० विक्रमांना गवसणी; वाचा सविस्तर माहिती

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यात दोन्ही संघांनी मैदानात धावांचा पाऊस पाडून १० विक्रमांना गवसणी घातली.

Published by : Naresh Shende

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यात दोन्ही संघांनी मैदानात धावांचा पाऊस पाडून १० विक्रमांना गवसणी घातली. सनरायजर्सने सर्वाधिक २७७ धावा करून आयपीएलमध्ये इतिहास रचला. परंतु, या धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत ५ विकेट्स गमावून २४६ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादच्या संघाने मुंबईचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात आक्रमक खेळी करणाऱ्या अभिषेद शर्माला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. अभिषेकने या सामन्यात २३ चेंडूत ६३ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत ८० धावांची नाबाद खेळी केली. तसंच मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्मानेही चमकदार कामगिरी केली. वर्माने ३४ चेंडूत ६४ धावा केल्या.

२७७/3 आयपीएल इतिहासातील संघाच्या सर्वाधिक धावा

आयपीएलच्या इतिहासात सनरायजर्सने २७७ ही सर्वाधिक धावसंख्या करून इतिहास रचला. हैदराबादने आरसीबीचा ११ वर्षू जुना विक्रम मोडला. आरसीबीने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरोधात २० षटकात ५ विकेट्स गमावून २६३ धावा केल्या होत्या.

५२३ धावा, एका सामन्यातील सर्वात जास्त धावा

हैदराबादने २७७ धावा केल्या, तर या धावांचा पाठलाग करताना मुंबईने २४६ धावा केल्या. म्हणजेच एका सामन्यात एकूण ५२३ सर्वाधिक धावांचा विक्रम बनला. टी-२० सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या आहे. याआधी सेंच्युरियनमध्ये खेळलेल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजने एकूण ५१७ धावा केल्या होत्या.

सर्वात जास्त षटकार (३८)

हैदराबाद आणि मुंबईत झालेल्या या सामन्यात एकूण ३६ षटकार ठोकण्यात आले. टी-२० मध्ये सर्वात जास्त षटकार लावण्याचा विक्रमाचीही या सामन्यात नोंद झाली. हैदराबादने १८ षटकार, तर मुंबई इंडियन्सने एकूण २० षटकार मारले.

२४६/५ (टार्गेटचा पाठलाग करताना सर्वात मोठी धावसंख्या)

हैदराबादने मुंबईला २७७ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने ५ विकेट्स गमावून २४६ धावा केल्या. टार्गेटचा पाठलाग करताना मुंबईने केलेली धावसंख्या ही आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या आहे.

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने रचला इतिहास

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने एकाच संघासाठी खेळताना २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारे हे दोघेही आयपीएल इतिहासातील पहिले फलंदाज आहेत.

क्वेना मफाफाने आयपीएल पदार्पणात दिल्या ६६ धावा

क्वेना मफाफाने आयपीएलमध्ये पदार्पण करून चार षटकांत ६६ धावा दिल्या. पदार्पणातच सर्वात जास्त धावसंख्या देण्याचा लाजिरवाणा विक्रम क्वेनाच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. याआधी मायकल नेसेरने २०२३ मध्ये आरसीबीविरोधात केलेल्या पदार्पणात ४ षटकात ६२ धावा दिल्या होत्या.

१६,१८,२३ आणि २४ चेंडूत अर्धशतक

या सामन्यात धावांचा पाऊस पडल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. अभिषेक शर्माने १६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. तर ट्रेविस हेडने १८ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तसच हेनरिक क्लासेनने २३ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने २४ चेंडूत अर्धशतक ठोकलं.

पहिल्या दहा षटकात सर्वात जास्त धावा

मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात सनरायजर्सने पहिल्या दहा षटकात एकूण १४८ धावा केल्या. पहिल्या दहा षटकात केलेल्या आयपीएल इतिहासातील या सर्वाधिक धावा आहेत.

२०० धावा

हैदराबाने मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात १४.४ षटकात २०० धावा पूर्ण केल्या होत्या. कमी षटकात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम या संघाच्या नावावर झाला आहे.

पॉवर प्लेमध्ये ८१ धावा

पॉवर प्लेमध्ये हैदराबादने ८१ धावा केल्या. आयपीएल इतिहासतील हा दुसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. याआधी केकेआरने २०१७ मध्ये पॉवर प्ले मध्ये ७९ धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्जने २०१५ मध्ये पॉवर प्ले मध्ये ९० धावा केल्या होत्या. सीएसकेच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambernath Viral Video : लिफ्ट बंद केल्याच्या रागातून 12 वर्षीय मुलाला बेदम मारहाण; अंबरनाथमधील CCTV Footage Viral

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

IAF Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले; दोन्ही वैमानिकांनी गमावला जीव

Pakistani Actress Death : भयंकर! दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू, सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाकिस्तानी अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूची चौकशी होणार