क्रीडा

RR vs DC Live | राजस्थान रॉयल्ससमोर 148 धावांचे आव्हान

Published by : Lokshahi News

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या बळावर हि धावसंख्या दिल्लीला गाठता आली. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामी जोडी मैदानात उतरली होती. मात्र सुरुवातीलाच दिल्लीला पहिला झटका बसला आहे. पृथ्वी 2 धावावर बाद झाला. तर शिखर धवन 9 धावावर विकेट गेली. त्यामुळे दिल्लीची सलामीची जोडी अपयशी ठरली आहे. त्यानंतर अजिंक्य राहणे 8, मार्कस स्टोइनिस 0, ललित यादव 20, टॉम कुर्रन 21, क्रिस वोक्स 15, रविचंद्रन अश्विन 7 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक 51 धावा ऋषभ पंतने केली आहे. या धावसंख्येच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावा गाठल्या.

दरम्यान आता राजस्थान रॉयल्ससमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. राजस्थान रॉयल्स हे आव्हान कसे पूर्ण करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा