पंजाबने पाच गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 91 धावा केल्या. तर ख्रिस गेलने 24 चेंडूत 46 धावांची झंझावाती खेळी केली.
पंजाबचे पाच गडी बाद झाल्याने संघाची धावसंख्या मंदावली होती. मात्र केएल राहुलने ५७ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. ख्रिस गेल 46 धावा केल्या. गेलनं कायल जेमिसनच्या गोलंदाजीवर ५ चौकार ठोकले. या बळावर पंजाबने पाच गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. यामुळे आता बंगळुरुसमोर विजयासाठी 180 धावांचे आव्हान असणार आहे.