क्रीडा

IPL 2024 MI vs SRH: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू टीममधून बाहेर

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024 मधील 8वा सामना पाच वेळची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये 27 मार्च म्हणजेच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला दरवर्षीप्रमाणं आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सचा गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभव झाला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या फिटनेस टेस्टनंतरही एनसीएने मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला क्लीन चिट दिलेली नाही. आता सूर्यकुमार यादव हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हैदराबादमधील खेळपट्टी ही सपाट असेल, त्यामुळे फलंदाजांना चांगली मदत मिळण्याची शक्याता आहे. मात्र सामना जसा पुढे जाईल तशी येथे फिरकीपटूंनाही मदत मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला चांगला फायदा होतो. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गुरुवारी हैदराबादमध्य हवामान उष्ण आणि दमट असणार आहे, दिवसा तापमान सुमारे 40 अंश असेल. मात्र सायंकाळी तापमानात घट होणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही.

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. उद्याच्या मॅचमध्ये मुंबई आणि हैदराबादच्या टीमचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. सूर्यकुमार यादवनं फिट नसल्यानं मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप

Daily Horoscope 15 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मिळणार शुभ संकेत; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?