क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या वादळी खेळीने चेन्नईचा विजय; मुंबईचा सलग दुसरा पराभव

एमएस धोनीच्या संघाने सात गडी राखून विजय मिळवला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आयपीएल 2023 चा 12 वा सामना शनिवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये एमएस धोनीच्या संघाने सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात अजिंक्य रहाणेने चेन्नईसाठी दमदार कामगिरी केली. रहाणेने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. रहाणेने 27 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावांची तुफानी खेळी करत सीएसकेला सहज विजय मिळवून दिला.

या सामन्यात प्रथम मुंबई संघाने 20 षटकात केवळ 157 धावा करता केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला सलामीवीर डेव्हॉन कॉनवे शून्यावर बाद झाल्याने त्यांना धक्का बसला. त्याला जेसन बेहरेनडॉर्फने बोल्ड केले. यानंतर धोनीने रहाणेला फलंदाजीसाठी पाठवले आणि त्यानंतर रहाणेने तुफानी फलंदाजी करताना संघाला सहज विजय मिळवून दिला.

34 वर्षीय रहाणेने चौथ्या षटकात अर्शद खानच्या गोलंदाजीत 4 चौकार आणि एक षटकार लगावला. अर्शदच्या या षटकात एकूण २३ धावा केल्या. रहाणेशिवाय पहिल्या दोन सामन्यात अर्धशतक झळकावणारा रुतुराज गायकवाड 36 चेंडूत 40 धावा करून नाबाद परतला.

त्याचवेळी, शिवम दुबेने 26 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या तर अंबाती रायडूने तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 20 धावा केल्या. याआधी गोलंदाजीत चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर तुषार देश पांडे आणि मिचेल सँटनर यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने 13 चेंडूत 21, इशान किशनने 21 चेंडूत 32, कॅमरून ग्रीनने 12, सूर्यकुमारा यादवने 01, तिलक वर्माने 22, अर्शद खानने 02 आणि टीम डेव्हिडने 31 धावा केल्या. या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य