क्रीडा

अमेरिकन टेनिसपटूला कोरोनाची लागण

Published by : Lokshahi News

अमेरिकन स्टार महिला टेनिसपटू कोको गॉफला कोरोनाची लागण झाली आहे. कोकोने रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच ती ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही.

महिला टेनिस क्रमवारीत कोको २५व्या स्थानावर आहे. १७ वर्षीय कोकोने फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी आणि विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या १२ सदस्यीय टेनिस संघाचे नेतृत्व कोको करणार होती. कोकोने काल रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला कोरोना झाल्याचे आणि ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याविषयी सांगितले.

कोकोने लिहिले, "मी करोना पॉझिटिव्ह आढळली आहे आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. यामुळे मी फार निराश झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे आणि मला आशा आहे की भविष्यात हे वास्तव घडवून आणण्यासाठी माझ्याकडे आणखी बर्‍याच संधी असतील.""मला माझ्या संघाला आणि प्रत्येक ऑलिम्पियनला शुभेच्छा द्यायच्या आहेत."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."