Team Lokshahi
क्रीडा

Virat Kohli Birthday: अनुष्काने शेअर केले विराटचे कधीही न पाहिलेले फोटो, म्हणाली मायलव...

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, सध्याच्या काळातील जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक, आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस साजरा करत आहे.

Published by : shweta walge

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, सध्याच्या काळातील जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक, आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो मेलबर्नमध्ये आहे जिथे भारतीय संघाला T20 विश्वचषकाचा पुढील सामना खेळायचा आहे. दरम्यान, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने विराट कोहलीचे काधी न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि विराटच्या मित्रांपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्सनेही या पोस्टवर कमेंट देखील केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तीने विराट कोहलीचे असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसत आहेत. अनुष्काने लिहिले की, 'मायलव तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे साहजिकच मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्कृष्ट एंगल्स आणि फोटो निवडते. प्रत्येक प्रकारे, रूप आणि रूपात तुझ्यावर प्रेम.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आता झिम्बाब्वेशी 6 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी खेळणार आहे. सुपर-12 फेरीतील ग्रुप-2 मधील हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर संघाने सामना जिंकला तर उपांत्य फेरीचे तिकीट कापले जाईल. झिम्बाब्वे जिंकला तर भारतासाठी कठीण होईल. टीम इंडिया सध्या 6 गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा