Admin
Admin
क्रीडा

अर्जुन तेंडूलकरची दमदार कामगिरी, आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट

Published by : Siddhi Naringrekar

आयपीएलच्या 16 व्या हंगामात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. दीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या वर्षी त्याला मुंबईकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं.

आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. अर्जुन तेंडूलकरने त्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या कारकिर्दीतील पहिला गडी बाद केला आहे. या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात हैदराबादवर विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीची संधी दिली. अर्जुनने शेवटच्या षटकात अवघ्या चार धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अर्जुनच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार