Virat Kohli | Asia Cup 2022 team lokshahi
क्रीडा

विराट कोहली ठरणार आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवाचं कारण...

विराट कोहलीने केला मोठा खुलासा

Published by : Shubham Tate

Virat Kohli, Asia Cup 2022 : आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातही सर्व चाहत्यांच्या नजरा खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीवर असणार आहेत. विराट कोहली या मोठ्या सामन्याची तयारी करत आहे. दरम्यान, कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (asia cup 2022 india vs pakistan virat kohli)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवाचे कारण असेल. कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी लकी आहे. खरंतर हा कोहलीचा 100 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. कोहलीने जेव्हा 100 वा सामना किंवा डाव खेळला आहे तेव्हा भारताला फक्त विजयचं मिळाला आहे असं मागील आकडेवारी सांगत आहे.

विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे

विराट कोहली विश्रांतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच विराट कोहलीने खुलासा केला आहे की 10 वर्षात पहिल्यांदाच एक महिना बॅट उचलली नाही. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला, '10 वर्षांत पहिल्यांदा मी एक महिना माझी बॅट धरली नाही. माझ्या तीव्रतेचा थोडा गैरसमज होतोय हे माझ्या लक्षात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला