क्रीडा

Asian Athletics Championship : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी, स्टिपलचेस शर्यतीत मिळवले सुवर्णपदक

महाराष्ट्रातून अविनाश साबळेने आशियाई अ‍ॅथलेटिक्सच्या स्टिपलचेस सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

Published by : Prachi Nate

आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिसऱया दिवशी हिंदुस्थानी खेळाडूंनी सुवर्णपदक आपल्या ताफ्यात जमा केलं आहे. महाराष्ट्रातून अविनाश साबळेने आशियाई अ‍ॅथलेटिक्सच्या स्टिपलचेस सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने 3 हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियाई अ‍ॅथलेटिक्सच्या स्टिपलचेस ही स्पर्धा दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात सुरू आहे.

या सर्धेत 6 फेऱ्या उरलेल्या असताना अविनाश तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मध्यावर त्याने आपला वेग वाढवला. चार फेऱ्या शिल्लक असताना दोन जपानी धावपटू अविनाशचा पाठलाग करत होते. त्यानंतर तिसरी फेरी शिल्लक असताना जपानच्या युटारो निनाएने अविनाशला मागे सोडले. त्यानंतर शेवटच्या फेरीमध्ये अविनाशने वेग वाढवला आणि पहिल्या अडथळ्याच्या आधीच जपानी धावपटूला पिछाडीवर टाकत, सुसाट वॉटर जंप पूर्ण करत शेवटचा टप्पा पार केला. यावेळी त्याने 8 मिनिटे 20.92 सेकंदात सहजपणे सुवर्णपदक आपल्या नावे केले.

याआधी 1989 मध्ये दिना राम यांनी या शर्यतीत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2023 मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ज्योतीने 12.78 सेकंदात सुवर्णपदक जिंकले होते. ज्योतीने ही शर्यत पूर्ण करत आपले सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?