क्रीडा

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; बाबर आझमचा कर्णधार पदाचा तडकाफडकी राजीनामा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने विश्वचषक २०२३ मध्ये खराब कामगिरी केली होती. यावरुन क्रिकेट विश्वातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. यानंतर अखेर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर आझमने तिन्ही प्रकारातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्याने ट्विटरवरुन माहिती केली आहे.

बाबर आझम म्हणाला की, मला अजूनही तो क्षण स्पष्टपणे आठवतो जेव्हा मला पीसीबीकडून 2019 मध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदासाठी कॉल आला. पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणे हा प्रशिक्षक, खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाचा सामूहिक प्रयत्न होता, परंतु या प्रवासात माझ्या उत्कट पाकिस्तानी चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो.

आज मी सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हीच योग्य वेळ आहे. मी एक खेळाडू म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानकडून खेळत राहीन. माझा अनुभव आणि समर्पणाने मी नवीन कर्णधार आणि संघाला पाठिंबा देत राहीन. या उल्लेखनीय जबाबदारीसाठी मी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मनापासून आभार मानू इच्छितो, असेही बाबर आझम म्हणाला आहे.

दरम्यान, बाबर आझम 2019 मध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार झाला. बाबरने 20 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. याशिवाय त्याने 43 एकदिवसीय आणि 71 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. पाकिस्तानला विश्वचषक २०२३ च्या ९ लीग सामन्यांपैकी फक्त ४ सामने जिंकता आले, त्यानंतर संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही. बाबरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शान मसूद आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहीन शाह आफ्रिदी कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित