कुस्ती आखाड्यात सीमा बिस्लाला प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिचा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. मात्र, कुस्तीमध्ये पुरुष गटात बजरंग पुनियाने पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. इराणच्या मोर्तझा चेका घयासी या पहिलवानाला हरवून त्याने सेमीफानयमध्ये प्रवेश मिळवला आहे.
65 किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या एर्नाझर अकमतलीएव्ह याला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. यानंतर त्याने इराणच्या खेळाडूला हरवून आता उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.