क्रीडा

Tokyo Olympic 2020 | बजरंग पुनिया पराभूत… कांस्य पदकासाठी लढणार

Published by : Lokshahi News

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाचा फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात ५-१२ असा पराभव झाला आहे. बजरंगचा सामना तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अजरबैजानच्या हाजी अलीवशी झाला. या सामन्यात अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले. याआधी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी भारतासाठी  रौप्यपदक जिंकले.

बजरंग पुनिया पहिल्या फेरीत १-४ ने पिछाडीवर होता. त्याने दुसऱ्या फेरीत काही चांगले डावपेच खेळले. मात्र हाजी अलीवने या फेरीतही गुण घेत आपली आघाडी वाढवली. दोन मिनिटे असताना बजरंगने चॅलेंज घेतले, पण ते अयशस्वी ठरले. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करून ६५ किलो वजनी गटात इराणच्या मुर्तझा चेका घियासीवर विजय नोंदवला होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?