Admin
Admin
क्रीडा

CSK :तमिळनाडू विधानसभेत चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्याची मागणी, काय आहे नेमकं कारण वाचा

Published by : Siddhi Naringrekar

तामिळनाडूच्या एका आमदाराने सीएसके संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा विषय आता चांगलाच चर्चेत आला आहे. विधानसभेत क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या अनुदानाच्या मागणीदरम्यान धर्मपुरी, तामिळनाडू येथील पीएमके आमदार, एसपी व्यंकटेश्वरन यांनी आयपीएल फ्रँचायझीकडे कोणतेही स्थानिक खेळाडू नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज वर बंदी घालण्याची राज्य सरकारला विनंती केली आहे.

ते म्हणाले की, संघाचे नाव चेन्नई असे असूनही हा संघ प्रतिभावान स्थानिक खेळाडूंना संधी देत ​​नाही. तरुण आयपीएलचे सामने मोठ्या आवडीने पाहतात. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. संघात तामिळनाडूचे एकही खेळाडू नाही. आमच्या राज्यातील आणखी लोकांनी संघाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. असे त्यांनी सांगितले.

Priyanka Chaturvedi: चित्रा वाघ यांच्या जाहिरातीवरील वक्तव्यावर प्रियांका चतुर्वेदींचे प्रत्युत्तर

Sushma Andhare: शिवसेना UBTच्या जाहिरातवरून चित्रा वाघांचा हल्लाबोल, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

"...आता देश चालवण्यात महिलांचीही भागिदारी असणार", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Abhijeet Patil: अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला दिला पाठिंबा

"हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील", नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास