India Vs Bangladesh Test Series Team Lokshahi
क्रीडा

भारता विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बांगलादेशचा कर्णधार दिसला मेस्सीची जर्सीत

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन एका खास लूकमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला.

Published by : Sagar Pradhan

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला चितगाव कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना ढाका येथे होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत असून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन एका खास लूकमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. कर्णधार शाकिबने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनल मेस्सीची जर्सी घालून सराव केला. नुकताच मेस्सीने संघासाठी फिफा विश्वचषक 2022 जिंकला असून संपूर्ण जगात त्याची चर्चा आहे. शाकिबही मेस्सीचा फॅन असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मेस्सीच्या जर्सीतील शाकिबचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा