Jay Shah On IPL 2024
Jay Shah On IPL 2024 
क्रीडा

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर जय शहांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "IPL 2024 विदेशात..."

Published by : Naresh Shende

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे टप्पे आणि तारखा काल जाहीर केल्या. तत्पूर्वी, आयपीएल २०२४ भारतात होणार की विदेशात? असा सवाल संपूर्ण क्रिडाविश्वात निर्माण झाला होता. परंतु, भारतीय नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी आयपीएलच्या आयोजनाबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. निवडणुकांच्या तराखा घोषित केल्यानंतर शहा यांनी क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलबाबत मोठं विधान केलं. आगामी होणारी आयपीएल स्पर्धा विदेशात होणार नाही. १९ एप्रिलपासून ४ जूनपर्यंत निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. आयपीएल २२ मार्चला चेन्नईत सुरु होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. आतापर्यंत पहिल्या दोन सत्रांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे आयपीएलचं आयोजन दुबईत केलं जाईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला. धुमाळ पीटीआयशी बोलताना म्हणाले होते, आयपीएलला कुठेच स्थानांतरित केलं जाणार नाही. आम्ही लवकरच आयपीएलच्या नियोजनाबाबत अधिकृत घोषणा करणार आहोत. पहिल्या दोन आठवड्यांचा शेड्युल आधीच घोषित केला आहे.

गतवर्षीचा विजयी संघ चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या घरेलू मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळणार आहे. पीटीआयशी बोलताना जय शहा यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, संपूर्ण टूर्नामेंट भारतात आयोजित केलं जाईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जसं आयोजन केलं होतं, त्याप्रमाणेच यंदाही आयोजन करण्यात येईल. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा करत होतो.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...