BCCI wished Virat Kohli on his Birthday Team Lokshahi
क्रीडा

आतापर्यंतच्या कारकिर्दीची आकडेवारी शेअर करत बीसीसीआयने विराटला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

आज विराटचा 34वा वाढदिवस असुन तो कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात आक्रमक खेळाडू म्हणुन प्रसिद्ध होता तर, आता मात्र तो संघाला सावरून घेणारा व संयमी फलंदाज व उत्तम क्षेत्ररक्षक म्हणुन ओळखला जातो.

Published by : Vikrant Shinde

आज भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहलीचा 34 वा वाढदिवस आहे. देशासह जगभरात विराटाचे प्रचंड चाहते आहे. त्यामुळे अनेक विविध क्षेत्रातील दिग्ग्ज व्यक्ती कालपासूनच शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. कोहलीच्या वाढदिवसानिमित्त तर सोशल मीडियावर चाहत्यांचा महापूर आला आहे.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने आज एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये विराट कोहलीच्या आतापर्यंतच्या कामगिरीची आकडेवारी आहे. विराट कोहलीने एकूण 477 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 24350 धावा त्याने काढल्या आहेत. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 71 शतके झळकावली. विशेष म्हणजे ज्यावेळी टीम इंडियाने विश्वचषक जिंकला त्यावेळी तो टीमचा भाग होता. असे आकडेवारी जाहीर करत बीसीसीआयने खास शुभेच्छा दिल्या आहे.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी- २० विश्वचषक २०२२ सुरु आहे. त्यामध्ये विराट चांगल्या कामगिरी करत चाहत्यांना एक वेगळाच आनंद मिळवून देत आहे. विश्वचषकात आलेल्या परतीच्या फॉर्ममुळे त्याचा हा वाढदिवस खास ठरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा