क्रीडा

बुमराहच्या नव्या इनिंगला सुरुवात; लग्नाचे फोटो झाले व्हायरल

Published by : Lokshahi News

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे. या नव्या इनिंगविषयी खूप चर्चा होती. मात्र खरचं लग्न होणार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. आज अखेर जसप्रीतने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

जसप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने "आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे" या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.जसप्रीतने शेअर केलेल्या या फोटोवर कृणाल पांडे, श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कोण आहे संजना?
संजना गणेशन 'स्प्लिट्स व्हिला ७' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडल होती. संजनाने 'फेमिना ऑफिशियली गॉर्जियस' हा किताब जिंकला होता. त्यानंतर २०१२ मध्ये तिने 'फेमिना स्टाइल दिवा'मध्ये भाग घेतला होता. २०१४ मध्ये संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. संजनाने २०१९मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर 'मॅच पॉईंट' शोचे सुत्रसंचालन केले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा