क्रीडा

IND VS ENG: कर्णधार रोहित शर्माचं दमदार शतक, शुबमन गिलचीही शतकी खेळी, धरमशालेत पाडला धावांचा पाऊस

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून अखेरचा सामना धरमशाला येथे सुरु आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Published by : Dhanshree Shintre

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून अखेरचा सामना धरमशाला येथे सुरु आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २१८ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणलं. दरम्यान, या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने शतक ठोकलं. रोहित शर्माने १६२ चेंडूत १०३ धावा कुटल्या. तसच शुबमन गिलनेही अप्रतिम फलंदाजी करून १५० चेंडूत ११० धावा केल्या. दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडिया ४०० धावांचा टप्पा पार करु शकला.

भारतीय कर्णधार रोहित शर्माचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४८ वे शतक आहे. यातील ३५ शतके त्याने वयाच्या ३० व्या वर्षानंतर केली आहेत. वयाच्या ३० वर्षानंतर भारतासाठी सर्वाधिक शतके झळकवण्याच्या बाबतीत रोहित शर्माने सचिन तेंडूलकरची बरोबरी केली होती. या कालावधीत दोन्ही खेळाडूंच्या नावावर प्रत्येकी ३५ शतके आहेत. या कसोटी शतकासह रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारताचा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला आहे.त्याने प्रशिक्षक राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.दोघांच्या नावावर भारतासाठी ४८-४८ शतके आहेत. या यादीत विराट कोहली ८० शतकांसह दुसऱ्या तर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा