क्रीडा

Ind Vs Eng : भारताने उभारला धावांचा डोंगर.. इंग्लंडसमोर २२५ धावांचे आव्हान

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२- सामना पार पडत आहे. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यानंतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या पाच षटकांत ४४ धावा फटकावत इंग्लंडसमोर २२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच सलामी देत विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. आदिल रशीदने इंग्लंडसाठी पहिले षटक टाकले. या षटकात रशीदने तीनचा धावा दिल्या. पुढच्या षटकात भारताच्या सलामीवीरांनी आर्चरला दोन  चौकार खेचले. पाच षटकात या दोघांनी 44 धावा फलकावर लावल्या. तर, पुढच्याच षटकात मार्क वूडला षटकार ठोकत विराटने संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

यानंतर रोहितने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावगती पुढे नेली. आठव्या षटकात सॅम करनला अप्रतिम षटकार ठोकत रोहितने अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 30 चेंडूत रोहितने आपले अर्धशतक साकारले. रोहितने 34 चेंडूत 5 षटकार आणि 4  चौकार ठोकत 64 धावा केल्या. विराट-रोहितने 94 धावांची सलामी दिली.

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने रशीदला षटकार ठोकत दहाव्या षटकात  भारताचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इंग्लंडवर आक्रमण केले. इंंग्लंडच्या बाराव्या षटकात या दोघांनी ख्रिस जॉर्डनला चार चौकार खेचले. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सूर्यकुमारला आदिल रशीदने बाद केले. मोठा फटका खेळलेल्या सूर्यकुमारचा ख्रिस जॉर्डनने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. सूर्यकुमारने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा