RR vs DC, IPL 2024 
क्रीडा

IPL नियमामुळे खळबळ! पॉन्टिंग आणि गांगुलीचा उडाला गोंधळ, थेट अंपायरलाच विचारलं अन्...पाहा व्हिडीओ

राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करून आयपीएलमधील सलग दुसरा विजय मिळवला.

Published by : Naresh Shende

राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करून आयपीएलमधील सलग दुसरा विजय मिळवला. राजस्थानच्या रियान परागने आक्रमक फलंदाजी करून नाबाद ८४ धावा केल्या. राजस्थानने सामना जिंकल्यानंतर रियानला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत १८५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने १७३ धावाच केल्यानं त्यांचा पराभव झाला. एकीकडे रियानच्या चमकदार कामगिरीची चर्चा सुरु असतानाच रिकी पॉन्टिंग आणि सौरव गांगुलीही प्रकाशझोतात आले. दिल्लीचा संघ फलंदाजी करण्यासाठी जेव्हा मैदानात उतरला होता, तेव्हा पहिल्याच षटकात असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. तसंच फोर्थ अंपायरलाही मैदानात येऊन पॉन्टिंग आणि गांगुलीसोबत चर्चा करावी लागली.

राजस्थान रॉयल्सचे कर्णधार संजू सॅमसनने पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडनंतर रोवमॅन पॉवेलला मैदानात बोलावलं. डगआऊटमध्ये असलेल्या पॉन्टिंगने हे सर्व पाहिलं आणि अंपायरला इशारा केला. त्यानंतर फोर्थ अंपायर पॉन्टिंगजवळ गेले आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्याचदरम्यान गांगलीनेही आयपीएलच्या नियमांबाबत अंपायर्सशी चर्चा केली. त्यामुळे सामना पुन्हा सुरु होण्यात विलंब झाला.

पॉन्टिंग इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे गोंधळात पडला होता. राजस्थानच्या संघात प्लेईंग ११ मध्ये बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्डच्या रुपात तीन विदेशी खेळाडू होते. अशातच संघ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून विदेशी खेळाडूला मैदानात उतरवू शकते. राजस्थान रॉयल्सने रणनीतीनुसार असं केलं होतं. राजस्थानने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नांद्रे बर्गरता उपयोग केला होता. परंतु, क्षेत्ररक्षणावेळी राजस्थानने पॉवेलला मैदानात उतरवलं होतं. यामुळे पॉन्टिंग गोंधळात पडला होता. पॉवेल रियान परागच्या जागेवर सब्सटीट्यूट खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात आला. त्यावेळी पॉन्टिंगने पॉवेलला मैदानात पाहिलं आणि नियमावरून गोंधळ उडाला.

विदेशी खेळाडूंबाबत आयपीएलचा नियम काय आहे?

आयपीएलच्या नियमानुसार, एका संघाच्या प्लेईंग ११ मध्ये चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. त्यामुळे राजस्थानने सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बर्गरला समाविष्ट केलं होतं. परंतु, क्षेत्ररक्षण करण्यासाठी तौ मैदानात आला नाही. अशातच मैदानात तीनच विदेशी खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उतरले होते. अशातच दिल्लीने पॉवेलला फिल्डिंग करण्यासाठी मैदानात बोलावलं होतं.

आयपीएलचा नियम

नियम १.२.५ नुसार प्रत्येक संघ कोणत्याही संघासाठी सुरुवातीच्या ११ मध्ये ४ हून अधिक विदेशी खेळाडूंना सामील करुन घेऊ शकत नाही. आयपीएलमध्ये संघ आपल्या प्लेईंग ११ मध्ये ४ विदेशी खेळाडूंना सामील करून घेऊ शकतं. इॅम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार फ्रॅंचायजी नेहमी नाणेफेक झाल्यानंतर प्लेईंग ११ मध्ये तीन विदेशी खेळाडूंचा समावेश करते. एक भारतीय क्रिकेटर किंवा विदेशी खेळाडूच्या जागेवर एका विदेशी खेळाडूला इॅम्पॅक्ट खेळाडूच्या रुपात सब्स्टीट्यूट करु शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा