क्रीडा

CSK vs RCB : चेन्नई सुपरकिंग्सची विजयी सुरुवात, आरसीबीवर मात

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला.

Published by : Sakshi Patil

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सीझनला कालपासून सुरुवात झाली आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. या सामन्यात बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. हा सामना सीएसकेने जिंकला आहे. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गमावावा लागला.

फाफ डुप्लेसिसनं आक्रमक बॅटिंग कली. त्यांने ८ चौकार मारत 35 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या मुस्तफिजूर रहमाननं त्याला बाद केलं. रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाले. विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन आरसीबीच्या डावाला सावरतील असं वाटत असतानाच मुस्तफिजूर रहमाननं त्यांना बाद केलं. विराट कोहली 21 धावांवर तर कॅमरुन ग्रीनं 18 धावांवर बाद झाला. यानंतर अनुज रावतनं 25 बॉलमध्ये 48 धावा केल्या तर दिनेश कार्तिकनं 38 धावा केल्या.

आरसीबीनं दिलेलं 174 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नईची टीम मैदानात उतरली. मात्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड मोठी धावसंख्या करु शकला नाही. तो 15 धावा करुन बाद झाला. राचीन रवींद्रनं एका बाजुनं फटकेबाजी सुरुच ठेवली होती. त्यानं 15 बॉलमध्ये 37 धावा केल्या. त्यानं तीन षटकार आणि तीन चौकार लगावले होते. ऋतुराज गायकवाडला यश दयाळनं बाद केलं. तर राचीन रवींद्रला कर्ण शर्मानं बाद केलं. अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिशेल चेन्नईचा डाव सावरणार असं वाटत असतानाच 27 धावा करुन अजिंक्य रहाणे बाद झाला. डॅरेल मिशेल देखील 22 धावा करुन बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेनं चेन्नईचा डाव सावरला. चेन्नईनं 19 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवत आरसीबीला पराभूत केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू