Chennai super king  Team Lokshahi
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्सचा 'हा' खेळाडू अडकला विवाह बंधनात..

Published by : Saurabh Gondhali

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर डेव्हन कॉनवेनं (Devon Conway) गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत (Girlfriend Kim Watson) नुकतंच लग्न केलंय. अलीकडंच तो त्याच्या लग्नासाठी आयपीएलच्या 2022 बायो बबलमधून बाहेर पडलाय. बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर, कॉनवे एका खास प्रसंगासाठी त्याचा मूळ देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेत पोहोचलाय.

आता डेव्हनच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, कॉनवे आणि किम दोघंही गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

कॉनवेनं बायो बबल सोडण्यापूर्वी CSK नं तिच्यासाठी एक पारंपरिक प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती.

कॉनवेला सीएसकेकडून फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो केवळ 3 धावा करू शकला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी कॉनवे उपलब्ध होणार नाहीय. संघात सामील झाल्यानंतर, त्याला 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा