क्रीडा

VIDEO: पहिल्याच डावात Cheteshwar Pujaraनं ठोकलं शतक; जबरदस्त कामगिरी

चेतेश्वर पुजाराने पुन्हा शतक (Century) झळकावले. त्याने मिडलसेक्सविरुद्ध ससेक्सचे नेतृत्व केले असून कर्णधार म्हणून त्याने सामन्याच्या पहिल्या डावात शतक पूर्ण केले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 182 चेंडूत 115 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. मिडलसेक्सच्या कोणत्याही गोलंदाजाने त्याला बाद केले नाही. मिडलसेक्सकडून खेळणारा उमेश यादवही त्याला बाद करण्यात अपयशी ठरला.

Published by : Siddhi Naringrekar

चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पुन्हा शतक (Century) झळकावले. त्याने मिडलसेक्सविरुद्ध ससेक्सचे नेतृत्व केले असून कर्णधार म्हणून त्याने सामन्याच्या पहिल्या डावात शतक पूर्ण केले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 182 चेंडूत 115 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. मिडलसेक्सच्या कोणत्याही गोलंदाजाने त्याला बाद केले नाही. मिडलसेक्सकडून खेळणारा उमेश यादवही त्याला बाद करण्यात अपयशी ठरला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ससेक्सने 4 बाद 328 धावा केल्या होत्या. या सामन्यात मिडलसेक्सने नाणेफेक जिंकून ससेक्सला प्रथम फलंदाजी दिली. ससेक्सला 318 धावांवर तिसरा धक्का बसला. त्याच स्कोअरवर त्याला चौथा धक्काही बसला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली