क्रीडा

LLC 2023: ...अन् ख्रिस गेलच्या बॅटचे झाले २ तुकडे, व्हिडिओ होतोय व्हायरल

ख्रिस गेल लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गुजरात जायंट्सतर्फे खेळत होता. खेळादरम्यान ख्रिस गेलने असा चौकार मारला की त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले. हा सामना रांचीमध्ये झाला.

Published by : Team Lokshahi

LLC 2023: वेस्ट इंडिजचा खतरनाक फलंदाज ख्रिस गेल लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत होता. खेळादरम्यान ख्रिस गेलने असा चौकार मारला की त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले. गुजरात जायंट्सचा सामना भिलवाडा किंग्जशी झाला. या सामनादरम्यान ही घटना घडली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरात जायंट्सचा सामना सामना रांचीमध्ये झाला. सहाव्या षटकात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायन साइडबॉटमच्या चेंडूवर गेलने जोरदार फटकेबाजी केली. या सामन्यादरम्यान चेंडू कव्हरवरून गेला आणि सीमारेषा ओलांडली पण ख्रिस गेलची बॅट तुटली.

फक्त बॅट तुटली म्हणजे ख्रिस गेलचा खेळ संपला असे नाही. बॅट तुटली असून देखील ख्रिस गेल उत्तम कामगिरी करत होता. २७ चेंडूंच्या धमाकेदार खेळीत ख्रिस गेलने भिलवाडा किंग्जच्या पराभवाची गोष्ट लिहिली. इतकेच नाही तर ख्रिस गेलने २७ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांसह ५४ धावा केल्या. विशेष म्हणजे यादरम्यान ख्रिस गेलचा स्ट्राइक रेट १९२.५९ होता.

दरम्यान, ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये खेळताना दिसत नाही. आतापर्यंत ख्रिस गेलच्या नावे टी-२० मध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आहे. वयाच्या ४४ वर्षीदेखील ख्रिस गेलची मैदानावरील जादू मात्र कमी झालेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा