Commonwealth Game | CWG 2022 team lokshahi
क्रीडा

CWG 2022 : भारताने आणखी दोन सुवर्णपदकं जिंकली

भारतीय खेळाडूंनी यावर्षी आतापर्यंत 43 पदके पटकावली

Published by : Shubham Tate

Commonwealth Games 2022 : रविवारी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकांचा पाऊस पडत आहे. भारतीय बॉक्सर नीतू गंगासने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेसजतन डेमी जेडचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. (commonwealth game 2022 amit panghal and nitu ghanghas win gold medals)

अमित पंघाल आणि नीतू

नीतू गंघासशिवाय, भारतीय बॉक्सर अमित पंघलने पुरुषांच्या फ्लायवेट (48-51 किलो) गटात इंग्लंडच्या मॅकडोनाल्ड किरनचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. अमित पंघालने सुवर्ण जिंकल्याने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 15 वर गेली आहे, तर भारताने आतापर्यंत 11 रौप्य आणि 17 कांस्यपदके जिंकली आहेत. भारताच्या नावावर एकूण 43 पदके झाली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?