commonwealth games 2022 | CWG 2022 | gold medal | Commonwealth Results 2022
commonwealth games 2022 | CWG 2022 | gold medal | Commonwealth Results 2022  team lokshahi
क्रीडा

Commonwealth Games 2022 : अचंत शरथ कमलने टेबल टेनिसमध्ये पटकावले 22 वे सुवर्णपदक

Published by : Shubham Tate

commonwealth games 2022 : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळ २०२२ चा आज ११ वा आणि शेवटचा दिवस आहे. भारताचा अनुभवी खेळाडू अचंत शरथ कमल याने टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात अचांतने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव केला. अचंतने हा सामना 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 असा जिंकला. सध्याच्या खेळांमधील अचंत शरथ कमलचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तसेच एकेरीमध्ये दुसऱ्यांदा अचंतेने राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. (commonwealth games 2022 achanta sharath kamal gold medal match table tennis)

अचांतने सामना सहज जिंकला

अचंत शरथ कमलने आता तिसरा गेम 11-2 अशा फरकाने जिंकून सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अचंतची चमकदार कामगिरी सुरूच असून त्याने पुढील दोन गेम जिंकून सामना जिंकला आहे.

लियाम पिचफोर्डने अचंत शरथ कमलविरुद्धचा पहिला गेम 13-11 ने जिंकला. यानंतर अचंत शरथ कमलने दुसरा गेम 11-7 असा जिंकून सामना बरोबरीत आणला.

खेळांच्या 10व्या दिवशी म्हणजे रविवारी भारताने एकूण 15 पदके जिंकली होती. त्यानंतर 11व्या दिवशी भारताने सुवर्णासह खाते उघडले. दिवसाची सुरुवात पीव्ही सिंधूने महिला एकेरीची अंतिम फेरी जिंकून केली. त्यानंतर लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण जिंकून भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. भारताच्या नावावर 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके आहेत.

राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे पदक विजेते

1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

2. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)

3. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)

4. बिंदियारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

5. जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (67 किलो वजन उचलणे)

6. अचिंता शेउली - सुवर्णपदक (73 KG वेटलिफ्टिंग)

7. सुशीला देवी - रौप्य पदक (जुडो 48 किलो)

8. विजय कुमार यादव – कांस्य पदक (जुडो 60 किलो)

9. हरजिंदर कौर- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71KG)

10. महिला संघ- सुवर्णपदक (लॉन बॉल)

11. पुरुष संघ- सुवर्णपदक (टेबल टेनिस)

12. विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 किलो)

13. मिश्र संघ - रौप्य पदक (बॅडमिंटन)

14. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)

15. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)

16. तुलिका मान - रौप्य पदक (जुडो)

17. गुरदीप सिंग- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109+ केजी)

18. तेजस्वीन शंकर – कांस्य पदक (उंच उडी)

19. मुरली श्रीशंकर- रौप्य पदक (लांब उडी)

20. सुधीर- सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)

21. अंशू मलिक - रौप्य पदक (कुस्ती ५७ किलो)

22. बजरंग पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती 65 किलो)

23. साक्षी मलिक- सुवर्णपदक (कुस्ती 62 किलो)

24. दीपक पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती ८६ किलो)

25. दिव्या काकरन - कांस्य पदक (कुस्ती 68 किलो)

26. मोहित ग्रेवाल – कांस्य पदक (कुस्ती १२५ किलो)

27. प्रियांका गोस्वामी - रौप्य पदक (10 किमी चालणे)

28. अविनाश साबळे – रौप्य पदक (स्टीपलचेस)

29. पुरुष संघ - रौप्य पदक (लॉन बॉल)

30. जास्मिन लॅम्बोरिया - कांस्य पदक (बॉक्सिंग)

31. पूजा गेहलोत – कांस्य पदक (कुस्ती 50 किलो)

32. रवी कुमार दहिया- सुवर्णपदक (कुस्ती 57KG)

33. विनेश फोगट- सुवर्णपदक (कुस्ती ५३ किलो)

34. नवीन कुमार- सुवर्णपदक (कुस्ती 74 किलो)

35. पूजा सिहाग- कांस्य पदक (कुस्ती)

36. मोहम्मद हुसामुद्दीन - कांस्य पदक (बॉक्सिंग)

37. दीपक नेहरा- कांस्य पदक (कुस्ती ९७ किलो)

38. सोनलबेन पटेल – कांस्य पदक (पॅरा टेबल टेनिस)

39. रोहित टोकस- कांस्य पदक (बॉक्सिंग)

40. भाविना पटेल- सुवर्णपदक (पॅरा टेबल टेनिस)

41. भारतीय महिला संघ- कांस्य पदक (हॉकी)

42. नीतू घनघास - सुवर्णपदक बॉक्सिंग)

43. अमित पंघल- सुवर्णपदक (बॉक्सिंग)

44. संदीप कुमार – कांस्य पदक (१० किमी चालणे)

45. अल्धॉस पॉल - सुवर्णपदक (तिहेरी उडी)

46. ​​अब्दुल्ला अबुबकर- रौप्य पदक (तिहेरी उडी)

47. अन्नू राणी – कांस्य पदक (भालाफेक)

48. निखत जरीन- सुवर्णपदक (बॉक्सिंग)

49. अचंत आणि जी. साथियान - रौप्य पदक (टेबल टेनिस)

50. सौरव आणि दीपिका पल्लीकल – कांस्य पदक (स्क्वॉश)

51. किदाम्बी श्रीकांत – कांस्य पदक (बॅडमिंटन)

52. महिला संघ - रौप्य पदक (क्रिकेट)

53. गायत्री आणि त्रिशा जॉली - कांस्य (बॅडमिंटन)

54. अचंत आणि श्रीजा अकुला- सुवर्णपदक (टेबल टेनिस)

55. सागर अहलावत - रौप्य पदक (बॉक्सिंग)

56. पीव्ही सिंधू- सुवर्णपदक (बॅडमिंटन)

57. लक्ष्य सेन- सुवर्णपदक (बॅडमिंटन)

58. जी. साथियान- कांस्य पदक (टेबल टेनिस)

59. सात्विक-चिराग- सुवर्णपदक (बॅडमिंटन)

60. अचंत शरथ कमल - सुवर्णपदक (टेबल टेनिस)

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल