Dinesh Karthik Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022 : निर्णायक सामन्यालाच आरसीबीला जोरदार धक्का, 'या' मोठ्या खेळाडूवर कारवाई

आज रॉयल चॅलेंजर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स असा दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे.

Published by : shamal ghanekar

आज रॉयल चॅलेंजर्स (Royal Challengers Bangalore) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) असा दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. या दोन्ही टीममधील विजयी होणारी टीम फायनल सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध खेळणार आहे. आज होणारा सामना हा दोन्ही टीमसाठी निर्णायक सामना होणार आहे. या निर्णायक सामन्याआधीच आरसीबीला एक धक्का बसला आहे.

आरसीबी विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये बुधवारी एलिमेनेटर सामना रंगला होता. हा सामना कोलकाता येथे झाला होता. यावेळी आरसीबीचा प्रमुख खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने नियम मोडल्याच्या प्रकरणामध्ये दोषी आढळला. कार्तिकवर सामना आधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. त्याच्यावर अनुच्छेद क्रमांक 2.3 अंतर्गत लेव्हर 1 प्रकरणात कारवाई केली आहे. तसेच कार्तिकेनेही त्याची चूक मान्य केली आहे.

आरसीबी विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यावेळी कार्तिकने 20 बॉलमध्ये 37 रनांची वेगवान खेळी खेळली होती. तर कार्तिक आणि रजत पाटीदार यांच्यामध्ये 91 नाबाद अशी शानदार भागिदारी झाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा