क्रिकेट

Vaibhav Suryavanshi Century : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला, 35 चेंडूत ठोकले शतक

वैभवने फक्त 35 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केले.

Published by : Shamal Sawant

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळ आणले. वैभवने फक्त 35 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केले. वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 17 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि नंतर 35 चेंडूत शतक झळकावले. यासह, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडूही बनला.

गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले होते. वैभव वडील संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मुलाच्या कारकिर्दीसाठी, त्याने आपला व्यवसाय सोडला आणि त्याला त्याची जमीनही विकावी लागली. लहानपणी त्याला घराबाहेर जाळी लावून सराव करायला लावला जायचा. वैभव सूर्यवंशीने 14 व्या वर्षी अर्धशतक झळकावून त्याचाच सहकारी रियान परागचा विक्रम मोडला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली