केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी निर्णायक शेवटासह संपन्न झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला कसोटी सामन्यात भारताने ही मालिका विजयासह संपवली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील थरार अखेर शेवटच्या टप्प्यावर असताना 2-2 अशी बरोबरी करत पार पडला आहे. भारताने अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आहे. पाचव्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान दिले होते.
ज्याच्या पाठलाग करत इंग्लंडने 367 धावा करत हातातला डाव गमावला. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने शेवटच्या क्षणापर्यंत मारलेल्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडच्या तोंडातला घास भारताने हिसकावला. यावेळी सिराजने पहिल्या दोन ओव्हरमध्ये इंग्लंडच्या जेमी स्मिथ व जेमी ओव्हरटन या दोन विकेट घेतल्या. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने गस एटकिन्सनला जोश टंगची गरज असताना त्याला माघारी पाठवले. त्याचसोबत सिराजने यॉर्कवर एटकिन्सनचा त्रिफळा उडवला.
यावेळी मोहम्मद सिराज म्हणाला की, "खरं सांगायचं तर, आम्ही आज हा सामना जिंकलोय याचा मला आनंद झालाय. पहिल्या दिवसापासून आम्हाला कडवी टक्कर देऊन खेळाव लागत आहे. त्यामुळे आजच्या विजयासाठी मला माझ्या भावना शब्दांत मांडता येऊ शकत नाही. पण काल माझ्याकडून एक चूक झाली. काल जर मी हॅरी ब्रूकची कॅच सोडली नसती तर आज आम्हाला सामना खेळावाच लागला नसता".
"त्याची कॅच सुटली म्हणून आज आम्हाला पुन्हा सामना करावा लागला नाही तर आम्ही खुप आधीच सामना जिंकलो होतो. पण आम्ही थांबलो नाही, काल जे झाल त्यानंतर आज सकाळी उठल्यानंतर मी गुगलवरून Self Believe चा फोटो डाऊनलोड मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवला. मी हे करू शकतो, असा मी स्वतःला विश्वास दिला. आमचा आमच्या संघावर विश्वास होता. त्यामुळेच आम्ही सामना जिंकलो." असं म्हणत सिराजने आपल्या भावना व्यक्त केल्या.