3-06-2025 हा दिवस आणि ही तारीख आरसीबी तसेच सर्व क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. अखेर 18 वर्षांची प्रतिक्षा आरसीबीच्या आणि विराटच्या कामी आली. तब्बल 17 वर्ष विजयासाठी लढत 3 वेळा फायनलमध्ये आलेल्या आरसीबीला आणि विराटला 18 व्या वर्षी यश मिळालं. अखेर त्याच्या देखील हातात आयपीएलची ट्रॉफी झळकताना पाहायला मिळाली. यादरम्यान बंगळुरुमध्ये आरसीबीची विजयी मिरवणुकी काढण्यात आली आहे.
यावेळी त्यांच्यासाठी ओपन डेक बसमधून मिरवणुक काढण्यात येणार होती, मात्र वाहतुक कोंडीचा विचार करता ही ओपन डेक बस रद्द करण्यात आली. त्यामुळे आरसीबीच्या बसमधून त्यांची मिरवणुक काढण्यात येत आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीचा प्रकार झाला असून यात दुर्घटना झाल्या आहेत.
गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांचा सोम्य लाठी चार्ज जारी करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत 15 ते 20 जण जखमी झाले असून या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चिन्नास्वामी स्टेडीयबाहेर काही फॅन्स झाडावर चढले असून मुख्यमंत्री सिद्धारमै्यया रुग्णालयात जखमींना दाखल केलं आहे. त्याचसोबत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.