क्रिकेट

Team India : वेस्ट इंडिजनंतर ‘या’ देशाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार टीम इंडिया; जाणून घ्या

भारताने (Team India) दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 2-0 असा पराभव वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात करत मालिका आपल्या नावावर केली आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • भारतीय संघ कोणत्या देशाविरुद्ध मालिका खेळणार?

  • रेकॉर्ड काय आहे?

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2025 वेळापत्रक

भारताने दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 2-0 असा पराभव वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात करत मालिका आपल्या नावावर केली आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने देखील दमदार खेळाच्या जोरावर पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 ने ड्रॉ केली होती. यामुळे भारतीय संघाने 2027 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी आपला दावा मजबूत केला आहे. तर आता वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघ कोणत्या देशाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असा प्रश्न आता चाहते विचारताना दिसत आहे.

भारतीय संघ कोणत्या देशाविरुद्ध मालिका खेळणार?

आता भारतीय संघ (Team India) वेस्ट इंडिजच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. भारतीय संघ तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी-20 सामने (IND vs AUS)या दौऱ्यावर खेळणार आहे. पुन्हा एकदा यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे या मालिकेचा पहिला सामना खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे, जिथे 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी, दक्षिण आफ्रिका आशियाई भूमीवर आपली तयारी पूर्ण करेल.

रेकॉर्ड काय आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत 44 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने 16 जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 18 जिंकले आहेत. दहा सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघ 94 वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 51 जिंकले आहेत, तर भारताने 40 जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका 31 टी-20 सामन्यांमध्ये भिडले आहेत. भारताने 18 जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 12 जिंकले आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2025 वेळापत्रक

पहिला कसोटी सामना

14 ते 18 नोव्हेंबर 2025 ( कोलकाता)

दुसरा कसोटी सामना

22 ते 26 नोव्हेंबर 2025 (गुवाहाटी)

वन डे मालिका

पहिला सामना – 30 नोव्हेंबर | ( रांची)

दुसरा सामना – 3 डिसेंबर | (रायपूर)

तिसरा सामना – 6 डिसेंबर | (विशाखापट्टनम)

T20 मालिका

पहिला सामना – 9 डिसेंबर (कटक)

दुसरा सामना – 11 डिसेंबर (न्यू चंदीगड)

तिसरा सामना – 14 डिसेंबर (धरमशाला )

चौथा सामना – 17 डिसेंबर (लखनऊ)

पाचवा सामना – 19 डिसेंबर (अहमदाबाद)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा