दुबईत पार पडलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धुळ चारत विजयी झेंडा मिरवला. यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी स्पष्ट नकार दिला. सामनावीर व मालिकावीराचा सन्मान पार पडला, परंतु जेतेपदाची ट्रॉफी स्वीकारताना भारतीय संघाने नकवींच्या उपस्थितीत कोणताही सहभाग दाखवला नाही.
टीम इंडियातील खेळाडूंचा मैदानात टाईमपास
सर्व खेळाडू हे मैदानात टाईमपास करताना पाहायला मिळाले. यावेळी काही जण हे स्वत:च्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत होते. तर काही जण मैदानात झोपून फोनमध्ये स्क्रोल करत होते. ज्यात तिलक वर्मा, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल हे मैदानात झोपलेले पाहायला मिळत होते. तर दुसरीकडे संजू सैमसन, कुलदीप सिंह, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती हे मैदानात बसून मजाक-मस्ती करताना पाहायला मिळाले.
टीम इंडियाची सुरुवात कशी होती?
पाकिस्तानने टीम इंडियाला 147 धावांच आव्हान दिलं होत जे पूर्ण करण्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून सुरुवातीला शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोघे मैदानात उतरले. मात्र, दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. दर गिल देखील 10 बॉलमध्ये 12 धावा करत माघारी फिरला. एवढचं नव्हे तर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अवघा 1 रन घेत बाद झाला. यामुळे एकंदरीत टीम इंडियाची सुरुवात काहीशी चांगली पाहायला मिळाली नाही.
कोण ठरला सामनावीर?
यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताची परडी सावरली. यावेळी संजू सॅमसन 24 धावा करत माघारी फिरला. त्यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांच्या भागीदारीने पुन्हा भारताचा डाव सावरला. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या असताना रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत सामन्यावर भारताचे नाव कोरले. दरम्यान भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात तिलक वर्माने सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिलक वर्माने 53 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 69 नाबाद धावा केल्या.
कुलदीप यादवने पाकिस्तानची कंबर मोडली
तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांविषयी बोलायचं झालं तर, कुलदीप यादवने पाकिस्तानच्या फलंदाजांची कंबर मोडली. त्याने 4 षटकांत 30 धावा देत 4 गडी बाद केले. एवढचं नव्हे तर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी देखील पाकिस्तानचे प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.