(Suryakumar Yadav hugged Hardik Pandya) काल झालेल्या एलिमिनेटरसामन्यात मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांनी आपली शान राखून ठेवली. मुंबईच्या पलटनने पंजाबच्या मैदानावर गुजरातचा दारुण पराभव केला. यावेळी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि 228 धावा करत गुजरातसमोर 229 धावांच आव्हान ठेवलं. त्यानंतर गुजरातने देखील या मुंबईने दिलेल्या धावांचा पाटलाग करत 6 गडी गमावत 206 धावा केल्या, ज्यामुळे त्यांचा मुंबई इंडियन्ससमोर पराभव झाला आणि त्यांचा आयपीएल 2025मधून माघार घ्यावी लागली.
यावेळी मुंबई इंडियन्स या विजयासह थेट क्वालिफायर 2 मध्ये गेली. यावेळी मुंबईकडून रोहित शर्माने 50 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी खेळली आणि गुजरातला धु-धु धुतला आहे. तर जॉनी बेअरस्टोने 22 बॉलमध्ये 47 धावांची शानदार फंदाजी केली. सुर्यकुमार यादवने 20 बॉलमध्ये 33 धावा करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यासोबत मुंबई इंडियन्स क्वालिफाय 2 मध्ये पंजाब किंग्ससमोर आमने सामने येणार आहे. त्यामुळे क्वालिफाय 2 मध्ये रंगाणारा हा सामना फायनलमध्ये धडक मारण्याासठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
एलिमिनेटर सामन्याच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात आनंदमय क्षण पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडू क्वालिफाय 2 मध्ये गेल्याचा आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत होता. यावेळी सुर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यांचा एक भावनिक क्षण देखील पाहायला मिळाला. सर्वजण आनंद व्यक्त करत असताना सुर्यकुमार यादवने हार्दिक पांड्याला डोळे बंद करत गच्च मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. ही व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली असून ती व्हिडिओ जोरदार व्हायरल देखील होत आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघावर चाहत्यांच्या कौतुकांचा वर्षाव पडत आहे.