क्रिकेट

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभवने गाजवलं मैदान! कोच राहुल द्रविड जागेवरुन उठला अन्...; पाहा व्हिडिओ

वैभवचं शतक पुर्ण होताच राहुल द्रविड डगमगत जागेवरुन उठला आणि वैभवच्या शतकाचा जल्लोष साजरी करु लागले.

Published by : Prachi Nate

14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीने त्याच्या तुफानी खेळीने क्रिकेट क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूच लक्ष वळवून घेतलं. इतकचं नव्हे तर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग तसेच इतर दिग्गज खेळाडूंकडून कौतूकाची थाप पडत आहे. एवढचं नव्हे तर त्याच्या खेळीवर आयपीएलमधील इतर संघातील खेळाडूंकडून देखील कौतुक केलं जात आहे.

अशातच राजस्थान संघाचे कोच राहुल द्रविड यांनी देखील वैभवच्या शानदार शतकावर आपल्या भावना व्यक्त केल्या. वैभव सूर्यवंशी 94 धावांवर असताना त्याने जोरदार षटकार लगावत दणक्यात आपलं शतक पूर्ण केलं. यावर फ्रॅक्चर असलेले राहुल द्रविड खुर्चीवरुन तडकन उठले आणि डगमगत स्वतःला सावरतं त्याच्या शतकाचा जल्लोष साजरा करु लागले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हयरल होत आहे.

वैभवच्या वादळी खेळीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे खूप आनंदी झाले होते. असा जल्लोष त्यांना याआधी कधीच करताना पाहिलं नाही. राहुल द्रविड यांच्या पायाला आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच दुखापत झाली होती. ज्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर होत. यादरम्यान ते प्रत्येक सामन्यात व्हीलचेअरवर पाहायला मिळत होते. कालच्या सामन्यात मात्र वैभवची स्फोटक फलंदाजी पाहून राहुल द्रविड यांनी जागेवरून उडी मारली तसेच हात हवेत वरखाली करताना, टाळ्या वाजवताना आणि जोरजोरात ओरडताना कॅमेरामध्ये कैद झाले.

वैभवचं शतक पुर्ण होताच ते जागेवरुन तडकन उठले अनाचक उठल्यामुळे ते अडखळल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यांनी स्वत:ला सावरलं आणि वैभवच्या शतकाचा जल्लोष साजरी करु लागले. हरभजन सिंग आणि आरपी सिंह यांनी कॉमेंट्री करताना म्हणाले की, "राहुल द्रविड यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वत:च्या शतकाचं इतकं सेलिब्रेशन किंवा आनंद साजरा केला नसेल, जितका त्यांनी वैभवच्या शतकाचा केला".

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यावेळी गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांच आव्हन ठेवले होते. जे पुर्ण करत राजस्थानने 212 धावा करत दणदणीत विजय मिळवला. यावेळी वैभव सुर्यवंशीची सुपर कामगिरी राजस्थानच्या विजयाची कमान ठरली. त्याने 35 बॉलमध्ये 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत त्याने मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा अनुभवी गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट्स खेळले. आयपीएल टी20 इतिहासात सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली