क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान हे थरारक सामने रंगणार आहेत. यंदा टी 20i फॉर्मेटने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यावेळी भारताकडे यजमानपदाचा मान मिळाला आहे, त्यानंतर यूएईमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. यादरम्यान भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी सर्वात महत्त्वाचा आणि ज्या सामन्याची तीव्र प्रतिक्षा संपुर्ण भारताला असते तो भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 14 सप्टेंबरला खेळवण्यात येऊ शकतो.
नुकतचं पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. दरम्यान या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप आलेलं नाही, तर ते लवकरच जाहीर केलं जाणार असल्याची महिती अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी दिली आहे.