क्रिकेटविश्वातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले गेले. समोर आलेल्या माहितीनुसार, तमीम इक्बाल ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून खेळत असताना हा प्रकार घडला.
तमीम इक्बाल क्षेत्ररक्षण करत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. नंतर त्याला फजिलातुनेश रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यावेळी त्याच्यावर उपचार सुरु केले. त्याचा ईसीजी करण्यात आला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून तो आता व्यवस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.