आशिया कपनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया 19 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, हे दोघेही एकदिवसीय क्रिकेट खेळतात.
याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे निवृत्तीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार आहेत. या सामन्यांदरम्यान रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिलवर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासह पाच स्टार खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.
पांड्या, बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन आणि शमी बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय संघातून जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आले आहे. हार्दिक पंड्याला आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेण्यास सांगितले आहे. तर जसप्रीत बुमराह टी-20 संघात समावेश आहे, परंतु त्याला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि स्टार फलंदाज संजू सॅमसन यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यांना एकदिवसीय मालिकेसाठी वगळण्यात आलं आहे.
वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.