ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 च्या मालिकेची समाप्ती झाली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 या स्कोरने विजय मिळवत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे.
या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली. मात्र भारतीय संघाच्या घसरणीचा परिणाम त्यांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. BCCI ने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासह बैठकी दरम्यान काही नियम लागू केले जाणार आहेत.
या बैठीत खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा झाली ज्यामध्ये खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार देण्यात येणार असा प्रस्ताव ठेवण्यात आला. बीसीसीआयची कठोर पाऊलं सर्व खेळाडूंसाठी समान असणार असणार आहेत. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना 'काम तसा दाम' हा नियम लागू होणार आहे.