9 स्प्टेंबरपासून आशिया क्रिकेट चषकाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आशिया कप सुरु होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक नेत्यांनी आपली भूमिका देखील मांडली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संज राऊत यांनी गुरुवारी 11 सप्टेंबर सांगितले होते की, 14 सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्ष 'सिंदूर रक्षा' मोहीम सुरू करेल.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर बैठक घेतली. दरम्यान या बैठकीत बोलताना त्यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, "भारत- पाकिस्तान सामन्याबाबत आम्ही अनेक दिवस बोलतोय. आज खरी भाजप असती तर बीसीसीआयला सवाल केला असता की, पाकड्यांसोबत खेळण्याची हिंमतच कशी झाली." तसेच संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हा 'विश्वासघात' असल्याचे देखील म्हटले आहे
ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेवर भाजपचे आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी शेलार म्हणाले की, "यांचा विरोध राजकीय आहे, त्यामुळे हा राजकीय मतं घेण्याचा प्रयत्न आहे. ते स्वतःच्या घरी दाऊदचे नातेवाईक जावेद मियांदाद यांना बोलवतात, आणि हे आम्हाला काय सांगतात. यांना अधिकार काय आहे? कोण संजय राऊत? त्यांना त्यांच्या गावात कोणी विचारत नाही".
"भांडूपमध्ये देखील ते जिंकू शकत नाही. भारत पाकिस्तान यांच्यात कोणताही दौरा होणार नाही. द्विपक्षीय दौरा होणार नाही. बहुराष्ट्रीय दौऱ्यात देखील आम्ही भूमिवर जाणार नाही. आम्ही आमच्या संघाला कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यापासून किंवा सहभागी होण्यापासून रोखू शकत नाही. सरकारची भूमिका हीच आमची भूमिका आहे. "