महाकुंभमेळ्यामुळे IIT बाबा उर्फ अभय सिंह सध्या खूप चर्चेत आला आहे. काल त्याला राजस्थान येथे गांजा जवळ बाळगल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र त्याला लगेच जामीन मंजूर झाला. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने भारत पाकिस्तान मॅचदरम्यान भारताचा पराभव होणार असे भाष्य केले होते. मात्र त्याची ही भविष्यवाणी खोटी ठरली आणि भरताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता.
आज भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सेमी फायनल मॅच सुरु आहे. आयआयटी बाबाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या लढतीत कोण विजयी होईल, याबाबतचं भविष्य वर्तवलं आहे. याबद्दल IIT बाबाला विचारण्यात आले. त्यावर त्याने जास्त प्रतिक्रिया न देता फक्त ऑस्ट्रेलिया असे म्हंटले. बाकी काय होतं ते पुढे पाहू, असं उत्तर देऊन आयआयटी बाबाने तिथून बाजूला होणं पसंत केलं.