25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रंगताना पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी न्यूझीलंडकडून सर्वात आधी विल यंग आणि रचिन रविंद्र ही जोडी ओपनींगसाठी फलंदाजी करण्याासठी मैदानात आली.
सुरुवातीला किवी संघाकडून षटकार आणि चौकारासह जोरदार फलंदाजी पाहायला मिळाली. अस असताना टीम इंडियाचे गोलंदाज त्यांच्या भेदक गोलंदाजीसह किवी टीमवर भारी पडले आहेत. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेल (नाबाद ५३) आणि डॅरिल मिशेल (६३) यांनी अर्धशतके झळकावली. न्यूझीलंडने 7 गडी गमावत भारताला 252 धावांचे आव्हान दिले आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजाचा कहर
सुरवातीलाच वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीने विल यंगची पहिली विकेट घेतली. त्यानंतर कुलदीपच्या भरधाव बॉलची जादू पाहायला मिळाली कुलदीपने गोलंदाजीसाठी येताच पहिल्या बॉलमध्ये रचिन रविंद्रचा त्रिफळा उडवला त्यानंतर लागोपाठ त्याने केन विल्यमसनला ही आल्यापाऊली माघारी पाठवले. त्यानंतर 'सर' जडेजाने टॉम लॅथमचा 14 धावांसह बळी घेतला अन् भारताच्या खात्यात 4 विकेट जमा झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा वरुणचा चक्रव्युह किवी टीमवर भारी पडला वरुणने ग्लेन फिलिप्सला 34 धावांवर बाद केले.
44 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा अर्धा संघ कोसळलेला पाहायला मिळत असताना, मिचेल एकटाच भारतीय संघाविरूद्ध खेळताना दिसत होता. त्यानंतर शामीने डॅरिल मिचेलला क्लिनबोल्ड केल अन् भारतासाठी मोठी कामगिरी केली. अन् अखेर न्यूझीलंडला भारताकडून सातवा धक्का मिळाला, न्यूझीलंचा कर्णधार मिशेल सँटनरला किंग कोहलीने रनआऊट केलं. मात्र अक्षरच्या 35 व्या ओव्हरमध्ये रोहितने मिड विकेटवर आणि जडेजाच्या 36 व्या ओव्हरमध्ये गिलने सीमारेषेवर झेल सोडला. दोन्ही झेल इतके सोपे नव्हते पण दोघांनीही चांगला प्रयत्न केला. अशारितीने किवी टीमने अखेर भारतासाठी 252 धावांचे आव्हान दिले.